पिंपरी - निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील दोन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात महापालिकेची पिंपळे गुरव माध्यमिक शाळा व खासगी विद्यादीप माध्यमिक विद्यालय, काळेवाडी यांचा समावेश आहे. या निवडीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. या शाळांना प्रत्येकी २० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

No comments:
Post a Comment