Wednesday, 24 January 2018

नॉव्हेलच्या विद्यार्थ्यांची “स्टडी टूर’

  • पालक मंत्र्यांशी संवाद ः सायन्स पार्क, महात्मा फुले संग्रहालयास भेट
पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि. 20 ला शैक्षणिक सहली अंतर्गत सायन्स पार्क व महात्मा फुले संग्रहालयाला भेट दिली. विद्यार्थ्यांनी विविध विज्ञानावर आधारित वस्तू व प्रयोगांचा सहलीत आनंद घेतला. नॉव्हेलच्या विद्यार्थ्यांसाठी हा दुग्ध-शर्करा योग जुळून आला. यावेळी विद्यार्थ्यांची पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी भेट झाली. बापट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये मुलांना नवनवीन प्रयोग शिकण्यास मिळाले. यामुळे मुलांचा शैक्षणिकदृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळाली. शैक्षणिक सहलीत विद्यार्थी जेव्हा विज्ञानावर आधारित प्रयोग बघतात, तेव्हा त्यांच्या मनात कुतूहल व जिज्ञासा जागृत होते आणि यातूनच एखादा वैज्ञानिक वा संशोधक तयार होतो. तसेच, नॉव्हेल शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले.

No comments:

Post a Comment