रडत-खडत मेट्रो प्रकल्प “यार्डा’तून बाहेर आला. परंतु, पहिल्या टप्प्यात निगडीऐवजी पिंपरीपर्यंतच मेट्रो नेण्याचा हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. मेट्रो शहरात येणार पण अर्ध्या रस्त्यावर सोडणार ही कल्पना शहरवासियांच्या पचनी पडत नाही. मेट्रो सिटीच्या “ब्रॅंडींग’लाही त्यामुळे बाधा आली आहे. पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या माध्यमातून या अर्धवट प्रकल्पाविरोधात जनआंदोलन उभे राहिले आहे. पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी निधी देण्यास केंद्र व राज्य शासनाने हात वर केले आहेत. त्यामुळे महापालिकेला स्वखर्चावर हा मार्ग पूर्ण करावा लागेल. परंतु, महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ही बाब अशक्य दिसत आहे.

No comments:
Post a Comment