पिंपरी - एम्पायर इस्टेटसमोरून जाणाऱ्या पुलाचे काम मार्चमध्ये पूर्ण होण्याची शक्यता असून या मार्गावरील बीआरटीची कामे जूनपर्यंत संपविण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. पवना नदी, लोहमार्ग आणि जुना पुणे-मुंबई रस्ता ओलांडत शहरातील नागरिकांना पूर्वेकडून पश्चिमेकडे या दीड किलोमीटर लांबीच्या पुलावरून जाता येईल. काळेवाडी फाट्यापासून हा रस्ता सुरू होत असून त्यानंतर पुलावरून ऑटो क्लस्टरपर्यंत तसेच पुढे केएसबी चौक, चिखलीगावापर्यंत जाता येईल. सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरून वाहनांना आणि बीआरटीला स्वतंत्र मार्ग असेल.
No comments:
Post a Comment