पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी ते निगडी या महत्वाकांक्षी बीआरटी मार्गिकेवर (लेन) बस थांबा, रस्त्यांवर पांढरे व लाल पट्टे, वाहतूक नियंत्रक दिवे, दिशादर्शक फलक, गतीरोधक, डांबरीकरण, बॅरीकेट्स आदी सातत्याने होणारी कामे पाहून नागरिक अक्षरशा वैतागले आहेत. पुढील महिन्यात, पुढील महिन्यात, असे सांगत आयुक्त व प्रशासनाने 2017 घालविले. नवीन वर्षांचा सव्वा महिना उलटला. तरी बससेवा सुरूच झालेली नाही. कधी एकदाची या मार्गावरून बस धावते, याचे वेध त्रस्त वाहनचालक व पादचार्यांना लागले आहेत.
No comments:
Post a Comment