नवी दिल्ली – आरोग्य क्षेत्रासाठी केंद्र सरकारची प्रमुख योजना असलेल्या राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेंद्वारे सुमारे 10 कोटी गरिबांना आरोग्य सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या योजनेद्वारे गरिब कुटुंबांना एका वर्षासाठीच्या रुग्णालयाच्या खर्चासाठी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. क्षय रोगाच्या रुग्णांच्या पोषक आहारासाठी 600 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. आरोग्यसेवेसाठीच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. सरकारी निधीतून चालवली जाणारी ही सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना असणार आहे, असेही अर्थमंत्री जेटली यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात सांगितले.
No comments:
Post a Comment