ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतक-याला सक्षम करत असताना रोजगारनिर्मिती, व्यावसाय या माध्यमातून देशाला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. गरीब, महिला आणि वृद्धांना डोळ्यांसमोर ठेवून सरकारने उत्तम योजना आणल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आमि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कोट्यवधी भारतीयांच्या आकांक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. गोर-गरिब वर्गाला अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाला आहे. गरीब कुटुंबांसाठी आरोग्य योजना, आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आयुषमान भारत योजना राबवून सरकार देशवासीयांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लघु उद्योजकांसाठी ३ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment