Friday, 2 February 2018

बीआरटी हॅरिस ब्रिजपासून शिवाजीनगरपर्यंत

प्रवाशांच्या पसंतीस उतरेल्या बीआरटी योजनेमध्ये आणखी एका मार्गाची भर पडणार आहे. महापालिका प्रशासनाकडून हॅरिस पुलापासून 'सीओईपी'पर्यंत (शिवाजीनगर) बीआरटी योजना राबविण्याचा विचार केला जात असून, हे काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, निगडी ते दापोडी या दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून बीआरटी मार्ग करण्यात आला आहे. तोच मार्ग शिवाजीनगरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याने हॅरिस ब्रिज ते शिवाजीनगर येथील वाहतूक कोंडीतून पीएमपी प्रवाशांची सुटका होण्यास मदत होणार आहे. 

No comments:

Post a Comment