Friday, 2 February 2018

अर्थसंकल्प २०१८ : “स्टॅन्डर्ड डिडक्‍शन’चा दावा करण्यासाठी कागदपत्रे नकोत

नवी दिल्ली – उत्पन्नाला करासाठी अपात्र दर्शवण्यासाठी 40 हजार रुपयांची वजावट दाखवायला आता कोणत्याही कागदपत्रांची आवश्‍यकता भासणार नाही. पगारदार करदाते आणि निवृत्तीधारकांना ही सवलत अर्थसंकल्पामध्ये देण्यात आली आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशिल चंद्रा यांनी म्हटले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पगारदार करदाते आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी 40 हजार रुपयांच्या “स्टॅन्डर्ड डिडक्‍शन’बाबत ही मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment