पिंपरी- पवना धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध असतानाही ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शहरातील लालटोपीनगर, मोरवाडी गावठाण, म्हाडा, अमृतेश्वर कॉलनी यासह शहराच्या विविध भागात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवू लागली आहे. अनेक भागात सध्यस्थितीत पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने अखेर प्रभाग क्रमांक 10 मधील सुमारे शंभर महिलांनी झोपडपट्टी मजूर असोसिएशनच्या माध्यमातून आज (गुरुवारी) महापालिकेवर मोर्चो काढला. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देवून मोरवाडी, लालटोपीनगर, म्हाडा आणि परिसरात पाण्यासह मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या आंदोलनात कविता खराडे, नसिमा सैय्यद, ललिता जोशी, लक्ष्मी जोशी, मेहबुबा शेख यांच्यासह झोपडपट्टी मजुर असोसिएशनच्या पदाधिकारी, महिला वर्ग सहभागी झाला होता.
No comments:
Post a Comment