पुणे - देशांतर्गत विमान वाहतुकीत पुणे शहराने मोठी मजल मारली असून, देशात १७ मार्गांपैकी दिल्ली-पुणे-दिल्ली मार्ग सहाव्या क्रमांकावर पोचला आहे. गेल्या दहा वर्षांत या मार्गावरील प्रवासी संख्या तिपटीहून अधिक वाढली आहे. विविध क्षेत्रांत पुण्याचा वाढत असलेला लौकिक आणि येथील पायाभूत सुधारणांमध्ये होत असलेली वाढ, यामुळे पुण्यातून प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

No comments:
Post a Comment