पिंपरी - वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाकड फाट्याजवळ विकसित करण्यात आलेला भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत महापालिकेने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता पाच महिन्यानंतरही झालेली नाही. त्यामुळे ‘भुयारी मार्गाला मुहूर्त कधी मिळणार?, असा प्रश्न रोजच्या वाहतूक कोंडीला वैतागलेले नोकरदार विचारत आहेत. दरम्यान, प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.

No comments:
Post a Comment