चिखलीतील भंगाराच्या दुकानाला व गोदामाला शुक्रवारी (दि.23) दुपारी अचानक आग लागली. या आगीने तत्काळ रौद्र रुप घेतले. ही माहिती समजताच अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले.आग विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या आगीचे कारण समजू शकले नाही. या घटनेत नेमके किती नुकसान झाले, हे समजू शकले नाही. चिखली परिसरात शेकडो भंगार मालाची दुकाने आहेत. याठिकाणी वारंवार आगीच्या घटना घडत असतात. मात्र, महापालिका प्रशासनाने वेळोवेळी बोटचेपी भूमिका घेतल्याने या बेकायदा दुकानांवर कारवाई होत नाही. परिणामी, सर्व कायदेकानू धाब्यावर बसवून सुरु असलेली ही भंगार मालाची दुकाने चिखलीसाठी ज्वलंत प्रश्न बनली आहे.

No comments:
Post a Comment