पिंपरी (Pclive7.com):- बाळंतपणात पहिले अपत्य गमावल्याचे दुःख उराशी होते. अनेक वर्षांनी पत्नी गर्भवती राहिली अन खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने वायसीएम रुग्णालयात नोंदणी केली. अचानक पत्नीच्या पोटात दुखू लागल्याने चाकणहून थेट वायसीएम गाठले. मात्र डॉटरांनी बिना तपासताच दिलेल्या तारखेलाच या असे सांगत खडसावले. तर दुसरीकडे अर्जंट लिहले असतानाही रुग्णालयाने गर्दी असल्याचे सांगत सोनोग्राफी टाळली. पोटात कळा घेऊनच तिने पुन्हा चाकण गाठले. वेदना सहन करत रात्र गेली अन सकाळी ती घरातच बाळंतीण झाली. रुग्णालयात आणेपर्यंत त्या पोटच्या गोळ्याने जीव सोडला होता अन आईसुद्धा अर्धमेली झाली होती. अन ‘गरिबाला वाली नसतो’ असे म्हणत ते वडील हातात मुलाचे शव घेऊन न्यायासाठी फिरत होते.
No comments:
Post a Comment