Sunday, 11 March 2018

नागपूर लाडके; पुण्याला मात्र दोडके!

पुणे: मेट्रोसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्‍वासन देणाऱ्या राज्य शासनाने पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. प्रकल्पाचे काम पुढील वर्षभरात वेगाने होणार असल्याने महामेट्रोने 850 कोटींची मागणी केली होती. मात्र, शासनाने फक्‍त 130 कोटी रुपये देत पुणे मेट्रोची बोळवण केली आहे. त्यात 100 कोटी समभागापोटी, तर 30 कोटी कर्ज उभारणीसाठी दिले आहेत. म्हणजेच, मागणी केल्यापैकी अवघी 15.30 टक्के रक्कम पुण्यासाठी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी नागपूर मेट्रोसाठी महामेट्रोने पुण्याएवढाच निधी मागितला असताना, शासनाने नागपूर मेट्रोला 310 कोटींचा निधी (36.50 टक्‍के) मंजूर केला आहे.

No comments:

Post a Comment