पुणे : शहर व पिंपरी- चिंचवड परिसरात दुचाकी चोरून त्या ग्रामीण भागात सर्रास विकणाऱ्यांची साखळी कार्यरत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. चोरलेल्या दुचाकी कमी पैशांत आणि तत्काळ विकण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, कमी पैशांच्या आमिषाने या चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या व्यक्तीवर (रिसिव्हर) तीन वर्षे तुरुंगवास भोगण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आपली दुचाकी चोरीस जाऊ नये, यासाठीची पुरेपूर काळजी घेतानाच, जुनी दुचाकी खरेदी करताना ती चोरीची तर नाही ना, याचीही खबरदारी नागरिकांना घ्यावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment