पिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामे सुरू करण्याच्या उद्देशाने खराळवाडी ते संत तुकारामनगर दरम्यान उभारलेल्या खांबांवर पिअर कॅप बसविण्यास गेल्या पंधरवड्यात प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे खांबांवर व्हायाडक्ट बसविण्याचे काम लवकर पूर्ण करता येणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. पुण्यापेक्षाही पिंपरी- चिंचवडमध्ये रस्ता रुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी तुलनेने कमी होते. त्यामुळे मेट्रो प्रकल्प उभारणीच्या कामाला वेग आला आहे.
No comments:
Post a Comment