Monday, 26 March 2018

डॉक्‍टरला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी – डॉक्‍टरांच्या चुकीमुळे तरुण रुग्ण दगवल्याचा आरोप करत नातेवाईकांकडून डॉक्‍टरला मारहाण करण्यात आली. हा प्रकार पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात घडला. या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्‍टरांनी संप पुकारला होता. अखेर सायंकाळी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी आंदोलन स्थगित केले.

No comments:

Post a Comment