पिंपळेनिलख आणि रावेत येथील पदपथाची रचना पुणे महापालिकेच्या धर्तीवर नव्याने आधुनिक पद्धतीने पिंपरी-चिंचवड महापालिका करणार आहे. प्रायोगिक तत्वावर पिंपळेनिलख आणि रावेत येथील पदपथाचे काम करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पदपथवार पार्किंगची व्यवस्था, नागरिकांना चालण्यासाठी जागेस प्राधान्य, बाकडे, दिशादर्शक फलक असणार आहेत. तसेच पदपथाचे सुशोभीकरण देखील केले जाणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांना दिली.
No comments:
Post a Comment