पिंपरी - कॉरिडॉर ऑपरेशन, भत्ता योजना, इन्फ्रास्ट्रक्चर शेअरिंग, खासगी वाहतूकदारांना बुकिंगची परवानगी, प्रवास भाडे आकारणीसाठी कार्ड सुविधा आदी आकर्षक योजना राबविल्यास शेकडो कोटी रुपयांच्या तोट्यात अडकलेली एसटी बाहेर पडेल व अल्पावधीतच नफ्यामध्ये धावेल, असा विश्वास भोसरीतील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) व्यक्त केला आहे. विविध प्रकारचे सर्वेक्षण, तुलनात्मक अभ्यासातून त्यांनी एसटी महामंडळाला उपाययोजनाही सुचविल्या आहेत.
No comments:
Post a Comment