चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. 1 मेपासून पोलीस आयुक्तालयाचा कारभार सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र, पोलीस आयुक्तालय कुठे होणार याची चर्चा सुरू आहे. आयुक्त कार्यालयात 200 पोलीस कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था आणि कंट्रोल रूमची पूर्तता करावी लागणार आहे. आयुक्तालयासाठी 4 हजार 840 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आवश्यक आहे. त्यापैकी सुरूवातीला 2 हजार 227 अधिकारी, कर्मचारी वर्ग केले जाणरा असून आणखी 2 हजार 633 अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदभरती करावी लागणार आहे. तर प्रथम पोलीस आयुक्त होण्यासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
No comments:
Post a Comment