Sunday, 15 April 2018

शुभमुहूर्त पाहून जलपर्णी काढा; युवक कॉंग्रेसतर्फे आयुक्तांना पंचाग भेट

चौफेर न्यूज – सांगवी परिसरातून जाणाऱ्या मुळा व पवना नदीत गेल्या काही दिवसांपासून जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जलपर्णी काढण्याबाबत मनपा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही काहीच कारवाई होत नाही. येथील नागरिक त्रस्त झाले असून विविध आजारांचा सामना करावा लागत आहेत. त्यामुळे युवक  कॉंग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शुभमुहूर्त पाहून जलपर्णी काढावी, अशी उपरोधिक मागणी करत पंचाग भेट दिले.

No comments:

Post a Comment