चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड ग्रामीण भागातून निर्माण झालेली नगरी असून या नगरीने लोककलेला नेहमीच दाद दिली आहे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा व लोकरंग सांस्कृतिक कलामंच यांच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या तिस-या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलत होते.
No comments:
Post a Comment