पिंपरी - कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये लहान मोठ्या सर्व कंपन्यांनी स्वतःचा हिस्सा भरणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनेक कंपन्या ही रक्कम भरतच नाहीत. पिंपरी-चिंचवड परिसरातील अशा 622 कंपन्या भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) कार्यालयाने शोधून काढल्या आहेत. या कंपन्यांची 800 बॅंक खाती सील करून त्यामधून एक कोटी 32 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पीएफ कार्यालयाचे विभागीय आयुक्त अमिताभ प्रकाश यांनी "सकाळ'ला दिली. गेल्या आर्थिक वर्षात ही कारवाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment