पिंपरी - ‘‘महिलांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा, यासाठी महापालिका हद्दीतील किमान आठवी उत्तीर्ण महिलांना हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गरजू महिलांना वाहन खरेदीसाठी महापालिकेमार्फत अनुदानाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोरवाडी आयटीआयमार्फत ऑनलाइन परीक्षेचा सराव करून घेण्यात येणार आहे,’’ अशी माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर यांनी दिली.
No comments:
Post a Comment