आळंदी पालिका कर्मचाऱ्यांचा प्रयोग; पिंपरीच्या सांडपाण्यामुळे समस्या
आळंदी (पुणे): पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे आळंदीत इंद्रायणी नदीपात्रात गेले काही महिने जलपर्णीची बेसुमार वाढ झाली आहे. पाणी पुरवठ्याच्या बंधाऱ्यातून पाणी उपसणेही कठीण झाले होते. त्यावर नगरपालिकेने कमी खर्चाचा उपाय शोधला असून प्लॅस्टिकचे 135 ड्रम वायरच्या साहाय्याने एकमेकांना बांधून ते पाण्यात सोडले आहेत, त्यामुळे जलपर्णी आटोक्यात आणली आहे. त्यासाठी पालिकेला सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला आहे.
No comments:
Post a Comment