पिंपरी - विदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी तळेगावला पसंती दिल्याने या परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर या भागाला सोन्याचे दिवस येणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तळेगाव टप्पा दोनमध्ये चार विदेशी कंपन्यांना उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी 90.73 हेक्टर जमीन दिली आहे. त्यापैकी दोन कंपन्यांना मार्चमध्ये "ऑफर लेटर' देण्यात आल्याची माहिती "एमआयडी'चे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांनी "सकाळ'ला दिली.
No comments:
Post a Comment