पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेला लागून असलेले जांबे हे गाव आपला ग्रामीण बाज आजही सांभाळून आहे. कारखानदारी नसल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न तुटपुंजे आहे, तरी गावाचा पुरेसा विकास झालेला आहे. वीज, रस्ता, पाणी या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत. आजही येथील ८०-८५ टक्के कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. येथील ऊस संत तुकाराम साखर कारखान्याला गाळपासाठी जातो. त्या व्यतिरिक्तही भात, गहू, ज्वारीपासून कडधान्यांपर्यंत अनेक पिके घेतली जातात. महापालिका म्हटले की आरक्षणे आली, घरपट्टी, पाणीपट्टी असा करांचा बोजा वाढणार. गावातून शेती हद्दपार होणार, या भीतीतूनच गाव समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला गावकऱ्यांचा विरोध होत आहे. त्याबाबत अनेक जण उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment