येरवडा - येरवडा मध्यवर्ती कारागृहात तीस बराकींमध्ये २३२३ कैदी क्षमता आहे. मात्र, या ठिकाणी तब्बल पाच हजार कैदी दाटीवाटीने राहत आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाने नव्याने होणाऱ्या पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, पिंपरी- चिंचवडमध्ये कारागृहासाठी आवश्यक पंधरा एकर जागा उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले. त्यामुळे कारागृह प्रशासनाने नव्याने येरवडा कारागृह मुद्रणालय कर्मचारी वसाहतीच्या मागील बाजूस अडीच हजार कैदी क्षमतेचे नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
No comments:
Post a Comment