पिंपरी-चिंचवड महापालिकेने दरवर्षी विविध कार्यक्रमामध्ये मान्यवरांना सत्कारा वेळी देण्यात येणार्या बुके, श्रीफळ व शाल यासारख्या खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यक्रमांमध्ये देण्यात येणार्या या वंस्तूवर होणार्या लाखोंच्या खर्चास स्थायी समितीने पायबंद घातला आहे. तसेच, दरवर्षी छापण्यात येणारी डायरी (दैनंदिनी) या पुढे न छापण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे पालिकेचे दरवर्षी लाखो रूपयांची बचत होणार असल्याचा दावा समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांनी केला आहे.

No comments:
Post a Comment