महापालिकेतर्फे चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या एम्पायर इस्टेट पुलाचे काम आठ वर्षांनी मार्गी लागले. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, पुलाचे उद्घाटन होऊन आठवडा लोटला तरी पुलावरून वाहनांची वर्दळ दिसत नाही. रॅम्प न झाल्याने नागरिकांना मोठा वळसा घेऊन पुणे-मुंबईच्या दिशेने जावे लागत असल्याने पुलाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.

No comments:
Post a Comment