बोपखेलकरांसाठी तीन वर्षांपूर्वी आलेली सकाळ आजही डोळ्यांसमोरून जात नाही. कारणही तसेच आहे. बोपखेलकरांचा हक्काचा रस्ता बंद केल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिकांचे होत असलेले हाल पाहून रस्ता सुरू करावा, या मागणीसाठी नागरिक जनता दरबारात सहभागी झाले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तीन वर्षांपूर्वीचा गुरुवार 21 मे 2015 हा दिवस बोपखेलकरांसाठी काळा दिवस ठरला. त्या हिसंक घटनेला आज तीन वर्ष पूर्ण झाली. मात्र, ना जिल्हा प्रशासन हलले, ना महापालिका प्रशासन हलले. त्यामुळे आजही बोपखेलकरांना रस्त्यासाठी 18 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो.
No comments:
Post a Comment