पिंपरी – चिखली, कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल समस्यांनी ग्रासले आहे. मैदानावर शेजारील रहिवासी वस्तीमधील गटारीचे पाणी येत असून मैदानावर दलदल निर्माण झाली आहे. मागील एक महिन्यांपासून खेळाडूंना चिखलातच सराव करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करुनही महापालिकेने अद्याप उपाययोजना केलेली नसल्याने खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment