पिंपरी – महापालिकेच्या सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. द्रवरूप आणि पावडर स्वरूपातील पॉली ऍल्युमिनिअम क्लोराईड दोन ठेकेदारांमार्फत पुरवून पाणी शुद्ध केले जाते. पावसाळ्यात पाण्याची गढुळता जास्त वाढण्याची शक्यता असल्याने आणखी 471 टन द्रवरूप आणि पावडर स्वरूपातील केमिकल्स घेण्यात येणार आहे. त्यासाठी 72 लाख रूपये खर्च होणार आहे. स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
No comments:
Post a Comment