पिंपरी - प्रदूषणामुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका कमी व्हावा, म्हणून केंद्र सरकारने शहरांतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसचा वापर करण्याचे ठरवले आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील रस्त्यांवर या बस चालविण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक प्रशिक्षण संस्थेला (सीआयआरटी) देण्यात आले आहेत. हा अहवाल तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे सीआयआरटीचे संचालक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले.
No comments:
Post a Comment