Thursday, 28 June 2018

ईसिएच्या उपक्रमात विद्यार्थी झाले सहभागी

विद्यार्थ्यांनी जमा केले घरचे प्लास्टिक
पिंपरी- एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनतर्फे शहरामधील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांमधूनच ई-कचरा संकलन केले जाते. मोशीमधील श्री श्री राविशंकर विद्यालय आणि तळवडेतील राजा शिवछत्रपती प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील एकदाच वापरू शकणारे प्लास्टिक एका ठिकाणी जमा केले. तसेच विद्यार्थ्यांनी 29 किलो ई-कचरासुद्धा आणून इसिएच्या ताब्यात पुढील व्यवस्थापनासाठी आणून दिल्याचे इसिएचे संचालक आणि पर्यावरण तज्ञ विकास पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment