जुनी सांगवी (पुणे) : रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक रस्त्याचे खोदाई काम काही दिवसांपुर्वी करण्यात आले होते. त्याजागी पालिका प्रशासनाकडुन खडी टाकुन खोदकामांचे चर भरण्यात आले. मात्र जड वाहने रस्त्यावरून गेल्यास याभागातील रस्ते खचल्याने मोठ्या गाड्या फसण्याचे प्रकार वाढले आहेत. गाड्या अडकुन राहिल्याने वहातुककोंडी होवुन रहदारीस अडथळा होत आहे. याच भागात शाळा असल्याने शाळकरी मुलांना रहदारीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे चारचाकी वाहने खचत आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरसिंह आदियाल यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment