पिंपरी – मल्टी प्लेक्समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्स नेण्यास परवानगी असताना देखील मल्टी प्लेक्समध्ये ते नेऊ दिले जात नाही. याच्या निषेधार्थ शहरातील विविध मल्टीप्लेक्समध्ये मनसेच्या वतीने शुक्रवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. यावेळी बिग सिनेमाच्या बाहेरील फलक फाडण्यात आला. तसेच खाद्य पदार्थ विक्री स्टॉल मधील पॉपकॉन फेकत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

No comments:
Post a Comment