Saturday, 30 June 2018

शहराच्या पर्यावरणाची चुकीच्या धोरणांमुळे दुर्दशा

पिंपरी – शहराच्या पर्यावरणाची दुर्दशा ही महापालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे होत असल्याचा आक्षेप घेत यात त्वरीत सुधारणा करण्याची मागणी पर्यावरण संवर्धन समिती (इसीए) या सामाजिक संस्थेने केली आहे. संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी महापौरांना संबोधित करून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील विकास व पर्यावरण यामध्ये काहीतरी मोठी गडबड सुरू आहे. आपण शहरातील सर्व नद्या प्रदूषित करत आहोत. अनावश्‍यक बाबींवरच जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवर सोयीस्कर रित्या पांघरुन घालून प्रलंबित ठेवण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment