नवी सांगवी (पुणे) : पितृदिनाचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथील रोझलँण्ड सोसायटीच्या वतीने सायकल दान हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भोसरी येथील ' स्नेहवन ' या संस्थेतील मुलांना जुन्या परंतु वापरात असलेल्या पंधरा सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी दुसरी ते दहावी या इयत्तेत शिकणारी पंचवीस मुलांना खाऊ वाटपही करण्यात आले. तसेच या मुलांनी सोसायटीच्या बागेत खेळण्याचा आनंदही लुटला.

No comments:
Post a Comment