नवी दिल्ली: रेल्वेच्या लेटलतीफ कारभाराला वैतागलेल्या लाखो प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सरकारनं पाऊल उचलले आहे. रेल्वे प्रशासनाच्या नवीन प्रस्तावानुसार, गाड्या उशिरा धावल्यास त्याची ‘किंमत’ रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोजावी लागणार आहे. जबाबदार अधिकाऱ्यांचे प्रमोशन रोखण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामगिरीत सुधारणा होऊन रेल्वेगाड्या वेळेत धावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment