पिंपरी : येथील ह्युमन्स सोसायटीच्यावतीने प्रयोगवन परिवार आणि टीम एकलव्यच्या सहयोगाने राबविले जाणार्या सायकलदान महाअभियानच्या अंतर्गत अहमदनगर येथील पिंपरकरणे गावात 18 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी रेडिओ सिटीच्या आर. जे. सोनाली, प्रयोगवन परिवाराचे अध्यक्ष सत्तार शेख, ह्युमन्स सोसायटीच्यावतीने समाधान पाटील, गडवाट परिवाराचे बीएसएफ फोडसे, संदीप दराडे आणि शाळेतील अध्यापक आदी उपस्थित होते. हा सायकल वितरणाचा पहिला टप्पा असून, अजून बर्याच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचणार असल्याचे सायकलदान महाअभियानचे समन्वयक समाधान पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment