वनाज ते रामवाडी (रिच 2) या मेट्रो मार्गावर एकूण 16 मेट्रो स्थानकेआहेत. यापैकी काही स्थानके रस्त्याकडेला असणार आहेत. रस्त्याच्या बाजूने असणार्या अशा स्थानकांचे बांधकाम करतेवेळी लाईट, फोन व इतर अशा अनेक सुविधांच्या वायरिंगचे जाळे असल्यामुळे खोदकाम करताना अडथळा होणाची शक्यता आहे. त्यामुळे येथील काम सुरू करण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या एजन्सीजशी बोलणी करून मगच कामाला सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या इतर कामापेक्षा स्टेशनच्या कामाला वेळ होत आहे.

No comments:
Post a Comment