पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाशेजारी पुणे मेट्रोचे स्टेशन उभारले जाणार आहे. पालिका भवन इमारत, मोरवाडी चौक, फिनोलेक्स कंपनी आणि कमला क्रॉस बिल्डिंग असे चार ठिकाणाच्या इन व आऊट गेटमधून प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. शहरात मेट्रोची मार्गिका उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 163 फाउंडेशन पूर्ण झाले आहेत. तर 117 पिलर उभे राहिले आहेत. सेगमेंटची जुळणी 14 स्पॅनमध्ये पूर्ण झाली आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पालिका भवन येथील मेट्रोचे स्थानक कसे असेल, याची शहरवासीयांना उत्सुकता लागली आहे.
No comments:
Post a Comment