पिंपरी – पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणाऱ्या दापोडी येथील हॅरिस पुलाला समांतर पुलाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. पुणे शहर व इतर भागातून पिंपरी शहरात नोकरी, व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता हा पूल वाहन चालकांसाठी “जीवनवाहिनी’ ठरला आहे. या पुलामुळे सतत होणारी वाहतूक कोंडी बहुतांशी प्रमाणात कमी झाली आहे. तसेच, पुण्याकडून पिंपरीकडे येणारी दुसरी बाजू डिसेंबर अखेर पूर्ण करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

No comments:
Post a Comment