Thursday, 12 July 2018

…अन्यथा आयुक्‍तांना खिळे भेट

पिंपरी – आंघोळीची गोळी आणि इतर सामाजिक संस्थांमार्फत “खिळेमुक्‍त झाड’ हे अभियान गेले चार महिन्यापासून शहरात चालू आहे. शहरातील सर्वच स्तरातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काही झाडांवर अजूनही फ्लेक्‍स, बॅनर आणि खासगी क्‍लासच्या जाहिरातींमुळे झाडांचे विद्रुपीकरण सुरूच आहे. संस्थेने कारवाई करण्यासाठी आयुक्तांना निवेदनही दिले आहे. संबंधितांवर कारवाई होत नसल्याने गेल्या महिन्यात काढलेले सुमारे दहा हजार खिळे आयुक्‍तांना भेट देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment