Thursday, 12 July 2018

माध्यमिक शिक्षकांच्या मानधनात वाढ

चार हजार ऐवजी मिळणार आठ हजार रुपये
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या माध्यमिक शाळेत मानधन तत्वावर भरण्यात येणार्‍या शिक्षकांच्या मानधनात वाढ केली आहे. हे मानधन चार हजार रुपये प्रतिमहावरून आठ हजार रुपये प्रतिमहा असे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात माध्यमिक शाळेसाठी मानधन तत्वावर भरण्यात येणार्‍या शिक्षकांना पालिकेकडून प्रतिमहा आठ हजार रुपये मानधन मिळणार आहे.

No comments:

Post a Comment