सांगवी - येथील पी.डब्ल्यु.डी.मैदानावर गाडी शिकण्यासाठी नेहमी गर्दी असते. तर जुनी सांगवी नवी सांगवीकडे या मोकळ्या मैदानातुन जाण्यासाठी शॉर्टकट म्हणुन अनेकजण येथुन गाड्या घेवुन जातात. आनेक चारचाकी वाहनेही येथे नागरीक लावतांना दिसतात. संततधार पावसामुळे मैदानावर चिखल झाला आहे. परंतु काही अती उत्साही तरूण चिखलातुन गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका अती उत्साही तरूणाला येथुन गाडी घेवुन जाण्याचा प्रयास नडला. मैदानावरील लाल चिखलात गाडी रूतल्याने या तरूणासोबतच ईतर नागरीकांची गाडी बाहेर काढण्यासाठी तारांबळ उडाली. अखेर ईतर नागरिकांच्या प्रयत्नामुळे गाडी बाहेर काढण्यात यश आले.

No comments:
Post a Comment