पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत गेलेल्या पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाने पालखी मार्गावरील काटेवाडी, बारामती येथील उसाच्या शेताला लागलेली आग विझविली. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. पालखी मार्गावरील काटेवाडी, बारामती येथील राजेंद्र निंबाळकर आणि शहाजी निंबाळकर यांच्या एक एकर उसाच्या शेतीला शॉर्ट सर्किटमुळे शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. त्यावेळी पालखी या मार्गावरून जाणार होती.

No comments:
Post a Comment