पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीत वाढ झाल्यामुळे भारमान क्षमतेपेक्षा 30 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळेच खंडाळा परिसरात रुळाचा तुकडा पडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. असे धोके टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला हा वाढणारा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम प्रस्तावित आहे. त्यापैकी एक ट्रॅक लवकर उपलब्ध झाल्यास भार कमी होऊ शकेल.

No comments:
Post a Comment